أَلۡهَىٰكُمُ ٱلتَّكَاثُرُ ١१. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकलेحَتَّىٰ زُرۡتُمُ ٱلۡمَقَابِرَ ٢२. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले)كـَلَّا سَوۡفَ تَعۡلَمُونَ ٣३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्यालثُمَّ كـَلَّا سَوۡفَ تَعۡلَمُونَ ٤४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईलكـَلَّا لَوۡ تَعۡلَمُونَ عِلۡمَ ٱلۡيَقِينِ ٥५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्यालلَتَرَوُنَّ ٱلۡجَحِيمَ ٦६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहालثُمَّ لَتَرَوُنَّهَا عَيۡنَ ٱلۡيَقِينِ ٧७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहालثُمَّ لَتُسۡـَٔلُنَّ يَوۡمَئِذٍ عَنِ ٱلنَّعِيمِ ٨८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल