بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ
عَبَسَ وَتَوَلَّىٰٓ ١१. त्याने तोंड आंबट केले आणि तोंड फिरविले أَن جَآءَهُ ٱلۡأَعۡمَىٰ ٢२. (केवळ अशासाठी) की त्याच्याजवळ एक आंधळा आला وَمَا يُدۡرِيكَ لَعَلَّهُۥ يَزَّكَّىٰٓ ٣३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता أَوۡ يَذَّكَّرُ فَتَنفَعَهُ ٱلذِّكۡرَىٰٓ ٤४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता أَمَّا مَنِ ٱسۡتَغۡنَىٰ ٥५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो فَأَنتَ لَهُۥ تَصَدَّىٰ ٦६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात وَمَا عَلَيۡكَ أَلَّا يَزَّكَّىٰ ٧७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही وَأَمَّا مَن جَآءَكَ يَسۡعَىٰ ٨८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो وَهُوَ يَخۡشَىٰ ٩९. आणि तो भीत (ही) आहे فَأَنتَ عَنۡهُ تَلَهَّىٰ ١٠१०. तर त्याच्याशी तुम्ही उपेक्षावृत्ती दाखविता كـَلَّآ إِنَّهَا تَذۡكِرَةٌ ١١११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे فَمَن شَآءَ ذَكَرَهُۥ ١٢१२. ज्याची इच्छा होईल (त्याने) यापासून बोध घ्यावा فِي صُحُفٍ مُّكَرَّمَةٍ ١٣१३. (हा तर) आदर-सन्मान पूर्ण ग्रंथांमध्ये आहे مَّرۡفُوعَةٍ مُّطَهَّرَةِۭ ١٤१४. जे उच्चतम व पवित्र आणि स्वच्छ शुद्ध आहेत بِأَيۡدِي سَفَرَةٍ ١٥१५. अशा लिहिणाऱ्यांच्या हातात आहे كِرَامِۭ بَرَرَةٍ ١٦१६. जे उच्च दर्जाचे पवित्र आहेत قُتِلَ ٱلۡإِنسَٰنُ مَآ أَكۡفَرَهُۥ ١٧१७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे مِنۡ أَيِّ شَيۡءٍ خَلَقَهُۥ ١٨१८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले مِن نُّطۡفَةٍ خَلَقَهُۥ فَقَدَّرَهُۥ ١٩१९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला ثُمَّ ٱلسَّبِيلَ يَسَّرَهُۥ ٢٠२०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला ثُمَّ أَمَاتَهُۥ فَأَقۡبَرَهُۥ ٢١२१. मग त्याला मरण दिले आणि मग कबरीत गाडले ثُمَّ إِذَا شَآءَ أَنشَرَهُۥ ٢٢२२. मग जेव्हा इच्छा होईल, त्याला जिवंत करील كـَلَّا لَمَّا يَقۡضِ مَآ أَمَرَهُۥ ٢٣२३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही فَلۡيَنظُرِ ٱلۡإِنسَٰنُ إِلَىٰ طَعَامِهِۦٓ ٢٤२४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे أَنَّا صَبَبۡنَا ٱلۡمَآءَ صَبًّا ٢٥२५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले ثُمَّ شَقَقۡنَا ٱلۡأَرۡضَ شَقًّا ٢٦२६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले فَأَنۢبَتۡنَا فِيهَا حَبًّا ٢٧२७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले وَعِنَبًا وَقَضۡبًا ٢٨२८. आणि द्राक्ष व भाजीपाला وَزَيۡتُونًا وَنَخۡلًا ٢٩२९. आणि जैतून व खजूर وَحَدَآئِقَ غُلۡبًا ٣٠३०. आणि घनदाट बागा وَفَٰكِهَةً وَأَبًّا ٣١३१. आणि मेवे व (गवत) चारा (देखील उगविला) مَّتَٰعًا لَّكُمۡ وَلِأَنۡعَٰمِكُمۡ ٣٢३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता فَإِذَا جَآءَتِ ٱلصَّآخَّةُ ٣٣३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल يَوۡمَ يَفِرُّ ٱلۡمَرۡءُ مِنۡ أَخِيهِ ٣٤३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून وَأُمِّهِۦ وَأَبِيهِ ٣٥३५. आणि आपल्या माता व पित्यापासून وَصَٰحِبَتِهِۦ وَبَنِيهِ ٣٦३६. आणि आपल्या पत्नी व आपल्या संततीपासून لِكُلِّ ٱمۡرِيٍٕ مِّنۡهُمۡ يَوۡمَئِذٍ شَأۡنٌ يُغۡنِيهِ ٣٧३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल وُجُوهٌ يَوۡمَئِذٍ مُّسۡفِرَةٌ ٣٨३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील ضَاحِكَةٌ مُّسۡتَبۡشِرَةٌ ٣٩३९. (जे) हसत आणि आनंदित असतील وَوُجُوهٌ يَوۡمَئِذٍ عَلَيۡهَا غَبَرَةٌ ٤٠४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील تَرۡهَقُهَا قَتَرَةٌ ٤١४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल أُوْلَٰٓئِكَ هُمُ ٱلۡكَفَرَةُ ٱلۡفَجَرَةُ ٤٢४२. हे तेच इन्कारी, दुराचारी लोक असतील