ملة الإسلام

السورة 83 · 36 آية · Muhammad Shafi I Ansari

سورة المطففين باللغة الماراثية

السورة بالعربية مع التفسير استمع إلى سورة المطففين (1,318 قارئاً)
مكيةسورة المطففين٣٦ آية

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

وَيۡلٌ لِّلۡمُطَفِّفِينَ ١१. मोठी वाईट अवस्था आहे माप-तोलमध्ये कमी करणाऱ्यांसाठी ٱلَّذِينَ إِذَا ٱكۡتَالُواْ عَلَى ٱلنَّاسِ يَسۡتَوۡفُونَ ٢२. की जेव्हा लोकांकडून माप मोजून घेतात तेव्हा पुरेपूर मोजून घेतात وَإِذَا كَالُوهُمۡ أَو وَّزَنُوهُمۡ يُخۡسِرُونَ ٣३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात, तेव्हा कमी देतात أَلَا يَظُنُّ أُوْلَٰٓئِكَ أَنَّهُم مَّبۡعُوثُونَ ٤४. काय त्यांना आपल्या मृत्युनंतर जिवंत होऊन उठण्याबाबतचा विश्वास नाही لِيَوۡمٍ عَظِيمٍ ٥५. त्या महान दिवसाकरिता يَوۡمَ يَقُومُ ٱلنَّاسُ لِرَبِّ ٱلۡعَٰلَمِينَ ٦६. ज्या दिवशी सर्व लोक, सर्व विश्वांच्या पालनकर्त्यासमोर उभे असतील كـَلَّآ إِنَّ كِتَٰبَ ٱلۡفُجَّارِ لَفِي سِجِّينٍ ٧७. निःसंशय, दुराचारी लोकांचा कर्म-लेख ‘सिज्जीन’ मध्ये आहे وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا سِجِّينٌ ٨८. तुम्हाला काय माहीत ‘सिज्जीन’ काय आहे كِتَٰبٌ مَّرۡقُومٌ ٩९. (हा तर) लिखित ग्रंथ आहे وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ١٠१०. त्या दिवशी खोटे उठविणाऱ्यांची मोठी दुर्दशा आहे ٱلَّذِينَ يُكَذِّبُونَ بِيَوۡمِ ٱلدِّينِ ١١११. जे मोबदला आणि शिक्षेच्या दिवसाला खोटे ठरवितात وَمَا يُكَذِّبُ بِهِۦٓ إِلَّا كُلُّ مُعۡتَدٍ أَثِيمٍ ١٢१२. याला फक्त तोच खोटे ठरवितो, जो मर्यादेचे उल्लंघन करणारा आणि अपराधी असतो إِذَا تُتۡلَىٰ عَلَيۡهِ ءَايَٰتُنَا قَالَ أَسَٰطِيرُ ٱلۡأَوَّلِينَ ١٣१३. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचल्या जातात तेव्हा तो म्हणतो की हे तर पूर्वीच्या लोकांचे किस्से आहेत كـَلَّاۖ بَلۡۜ رَانَ عَلَىٰ قُلُوبِهِم مَّا كَانُواْ يَكۡسِبُونَ ١٤१४. असे नाही, किंबहुना त्यांच्या मनावर त्यांच्या कर्मांमुळे गंज (चढलेला) आहे كـَلَّآ إِنَّهُمۡ عَن رَّبِّهِمۡ يَوۡمَئِذٍ لَّمَحۡجُوبُونَ ١٥१५. एवढेच नाही. हे लोक त्या दिवशी आपल्या पालनकर्त्याच्या दर्शनापासून वंचित ठेवले जातील ثُمَّ إِنَّهُمۡ لَصَالُواْ ٱلۡجَحِيمِ ١٦१६. मग या लोकांना निश्चितपणे जहन्नममध्ये फेकून दिले जाईल ثُمَّ يُقَالُ هَٰذَا ٱلَّذِي كُنتُم بِهِۦ تُكَذِّبُونَ ١٧१७. मग त्यांना सांगितले जाईल की हेच आहे ते, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिले كـَلَّآ إِنَّ كِتَٰبَ ٱلۡأَبۡرَارِ لَفِي عِلِّيِّينَ ١٨१८. निःसंशय, सत्कर्मी लोकांचा कर्म-लेख ‘इल्लियीन’ मध्ये आहे وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا عِلِّيُّونَ ١٩१९. तुम्हाला काय माहीत की ‘इल्लियीन’ काय आहे كِتَٰبٌ مَّرۡقُومٌ ٢٠२०. (तो तर) लिखित ग्रंथ आहे يَشۡهَدُهُ ٱلۡمُقَرَّبُونَ ٢١२१. अल्लाहचे निकटवर्ती (फरिश्ते) हजर असतात إِنَّ ٱلۡأَبۡرَارَ لَفِي نَعِيمٍ ٢٢२२. निःसंशय, नेक सदाचारी लोक (मोठ्या) सुखा-समाधानात असतील عَلَى ٱلۡأَرَآئِكِ يَنظُرُونَ ٢٣२३. आसनांवर बसून पाहात असतील تَعۡرِفُ فِي وُجُوهِهِمۡ نَضۡرَةَ ٱلنَّعِيمِ ٢٤२४. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच (अल्लाहच्या) कृपा देणग्यांची प्रफुल्लता ओळखाल يُسۡقَوۡنَ مِن رَّحِيقٍ مَّخۡتُومٍ ٢٥२५. या लोकांना शुद्ध निर्भेळ मद्य पाजले जाईल خِتَٰمُهُۥ مِسۡكٌۚ وَفِي ذَٰلِكَ فَلۡيَتَنَافَسِ ٱلۡمُتَنَٰفِسُونَ ٢٦२६. ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. इच्छा करणाऱ्यांनी त्याचीच इच्छा केली पाहिजे وَمِزَاجُهُۥ مِن تَسۡنِيمٍ ٢٧२७. आणि त्यात ‘तस्नीम’चे मिश्रण असेल عَيۡنًا يَشۡرَبُ بِهَا ٱلۡمُقَرَّبُونَ ٢٨२८. (अर्थात) तो झरा, ज्याचे पाणी, अल्लाहचे सान्निध्य लाभलेले लोक पितील إِنَّ ٱلَّذِينَ أَجۡرَمُواْ كَانُواْ مِنَ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ يَضۡحَكُونَ ٢٩२९. निःसंशय, अपराधी लोक ईमान राखणाऱ्या लोकांची थट्टा उडवित असत وَإِذَا مَرُّواْ بِهِمۡ يَتَغَامَزُونَ ٣٠३०. आणि त्यांच्या जवळून जाताना नेत्र कटाक्ष (व इशाऱ्याने) त्याचा अपमान करीत असत وَإِذَا ٱنقَلَبُوٓاْ إِلَىٰٓ أَهۡلِهِمُ ٱنقَلَبُواْ فَكِهِينَ ٣١३१. आणि जेव्हा आपल्या लोकांकडे परत येत, तेव्हा थट्टा - मस्करी करीत असत وَإِذَا رَأَوۡهُمۡ قَالُوٓاْ إِنَّ هَٰٓؤُلَآءِ لَضَآلُّونَ ٣٢३२. आणि जेव्हा त्यांना पाहत, तेव्हा असे म्हणत, निश्चितच हे लोक वाट चुकलेले आहेत وَمَآ أُرۡسِلُواْ عَلَيۡهِمۡ حَٰفِظِينَ ٣٣३३. यांना, त्याच्यावर निरीक्षक बनवून तर नाही पाठविले गेले فَٱلۡيَوۡمَ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ مِنَ ٱلۡكُفَّارِ يَضۡحَكُونَ ٣٤३४. तेव्हा आज ईमान राखणारे या इन्कारी लोकांवर हसतील عَلَى ٱلۡأَرَآئِكِ يَنظُرُونَ ٣٥३५. आसनांवर विराजमान होऊन पाहत असतील هَلۡ ثُوِّبَ ٱلۡكُفَّارُ مَا كَانُواْ يَفۡعَلُونَ ٣٦३६. की आता या इन्कार करणाऱ्यांनी, जसे कर्म ते करीत होते, त्याचा पुरेपूर मोबदला प्राप्त करून घेतला

الترجمة: Muhammad Shafi I Ansari.