ملة الإسلام

السورة 75 · 40 آية · Muhammad Shafi I Ansari

سورة القيامة باللغة الماراثية

السورة بالعربية مع التفسير استمع إلى سورة القيامة (1,389 قارئاً)
مكيةسورة القيامة٤٠ آية

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

لَآ أُقۡسِمُ بِيَوۡمِ ٱلۡقِيَٰمَةِ ١१. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची وَلَآ أُقۡسِمُ بِٱلنَّفۡسِ ٱللَّوَّامَةِ ٢२. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची أَيَحۡسَبُ ٱلۡإِنسَٰنُ أَلَّن نَّجۡمَعَ عِظَامَهُۥ ٣३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत بَلَىٰ قَٰدِرِينَ عَلَىٰٓ أَن نُّسَوِّيَ بَنَانَهُۥ ٤४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे بَلۡ يُرِيدُ ٱلۡإِنسَٰنُ لِيَفۡجُرَ أَمَامَهُۥ ٥५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे يَسۡـَٔلُ أَيَّانَ يَوۡمُ ٱلۡقِيَٰمَةِ ٦६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल فَإِذَا بَرِقَ ٱلۡبَصَرُ ٧७. तर जेव्हा डोळे जडवत होतील وَخَسَفَ ٱلۡقَمَرُ ٨८. आणि चंद्र निस्तेज होईल وَجُمِعَ ٱلشَّمۡسُ وَٱلۡقَمَرُ ٩९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील يَقُولُ ٱلۡإِنسَٰنُ يَوۡمَئِذٍ أَيۡنَ ٱلۡمَفَرُّ ١٠१०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे كـَلَّا لَا وَزَرَ ١١११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही إِلَىٰ رَبِّكَ يَوۡمَئِذٍ ٱلۡمُسۡتَقَرُّ ١٢१२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे يُنَبَّؤُاْ ٱلۡإِنسَٰنُ يَوۡمَئِذِۭ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ ١٣१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल بَلِ ٱلۡإِنسَٰنُ عَلَىٰ نَفۡسِهِۦ بَصِيرَةٌ ١٤१४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे وَلَوۡ أَلۡقَىٰ مَعَاذِيرَهُۥ ١٥१५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी لَا تُحَرِّكۡ بِهِۦ لِسَانَكَ لِتَعۡجَلَ بِهِۦٓ ١٦१६. (हे पैगंबर!) तुम्ही कुरआनास त्वरित तोंडी पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला (घाईने) हलवू नका إِنَّ عَلَيۡنَا جَمۡعَهُۥ وَقُرۡءَانَهُۥ ١٧१७. त्यास एकत्र करणे आणि (तुमच्या तोंडून) पठण करविणे आमची जबाबदारी आहे فَإِذَا قَرَأۡنَٰهُ فَٱتَّبِعۡ قُرۡءَانَهُۥ ١٨१८. (यास्तव) आम्ही जेव्हा त्याचे पठण संपवू तेव्हा तुम्ही त्याच्या पठणाचे अनुसरण करा ثُمَّ إِنَّ عَلَيۡنَا بَيَانَهُۥ ١٩१९. त्यास स्पष्ट करणे आमचे काम आहे كـَلَّا بَلۡ تُحِبُّونَ ٱلۡعَاجِلَةَ ٢٠२०. नव्हे, तुम्ही तर लवकर प्राप्त होणाऱ्या (जगा) शी प्रेम राखता وَتَذَرُونَ ٱلۡأٓخِرَةَ ٢١२१. आणि आखिरतला सोडून बसला आहात وُجُوهٌ يَوۡمَئِذٍ نَّاضِرَةٌ ٢٢२२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील إِلَىٰ رَبِّهَا نَاظِرَةٌ ٢٣२३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील وَوُجُوهٌ يَوۡمَئِذِۭ بَاسِرَةٌ ٢٤२४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील تَظُنُّ أَن يُفۡعَلَ بِهَا فَاقِرَةٌ ٢٥२५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल كـَلَّآ إِذَا بَلَغَتِ ٱلتَّرَاقِيَ ٢٦२६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील وَقِيلَ مَنۡۜ رَاقٍ ٢٧२७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे وَظَنَّ أَنَّهُ ٱلۡفِرَاقُ ٢٨२८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे وَٱلۡتَفَّتِ ٱلسَّاقُ بِٱلسَّاقِ ٢٩२९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल إِلَىٰ رَبِّكَ يَوۡمَئِذٍ ٱلۡمَسَاقُ ٣٠३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे فَلَا صَدَّقَ وَلَا صَلَّىٰ ٣١३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली وَلَٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ ٣٢३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰٓ أَهۡلِهِۦ يَتَمَطَّىٰٓ ٣٣३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला أَوۡلَىٰ لَكَ فَأَوۡلَىٰ ٣٤३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर ثُمَّ أَوۡلَىٰ لَكَ فَأَوۡلَىٰٓ ٣٥३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी أَيَحۡسَبُ ٱلۡإِنسَٰنُ أَن يُتۡرَكَ سُدًى ٣٦३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल أَلَمۡ يَكُ نُطۡفَةً مِّن مَّنِيٍّ يُمۡنَىٰ ٣٧३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो ثُمَّ كَانَ عَلَقَةً فَخَلَقَ فَسَوَّىٰ ٣٨३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले فَجَعَلَ مِنۡهُ ٱلزَّوۡجَيۡنِ ٱلذَّكَرَ وَٱلۡأُنثَىٰٓ ٣٩३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले أَلَيۡسَ ذَٰلِكَ بِقَٰدِرٍ عَلَىٰٓ أَن يُحۡـِۧيَ ٱلۡمَوۡتَىٰ ٤٠४०. काय (अल्लाह) या गोष्टी समर्थ नाही की मेलेल्यास जिवंत करावं

الترجمة: Muhammad Shafi I Ansari.