Millat al-Islam

Chapter 87 · 19 verses · Muhammad Shafi I Ansari

Surah Al-Ala in Marathi

Arabic with tafsir Listen to Surah Al-Ala (1421 reciters)
Meccanسورة الأعلى19 verses

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

سَبِّحِ ٱسۡمَ رَبِّكَ ٱلۡأَعۡلَى ١१. आपल्या अति उच्च पालनकर्त्याच्या नावाची पवित्रता वर्णन करा ٱلَّذِي خَلَقَ فَسَوَّىٰ ٢२. ज्याने निर्माण केले आणि सही सलामत बनविले وَٱلَّذِي قَدَّرَ فَهَدَىٰ ٣३. आणि ज्याने (यथायोग्य) अनुमान केले आणि मग मार्गदर्शन केले وَٱلَّذِيٓ أَخۡرَجَ ٱلۡمَرۡعَىٰ ٤४. आणि ज्याने ताजे गवत उगविले فَجَعَلَهُۥ غُثَآءً أَحۡوَىٰ ٥५. मग त्याने ते (सुकवून) काळा केर - कचरा करून टाकले سَنُقۡرِئُكَ فَلَا تَنسَىٰٓ ٦६. आम्ही तुम्हाला शिकवू, मग तुम्ही विसरणार नाही إِلَّا مَا شَآءَ ٱللَّهُۚ إِنَّهُۥ يَعۡلَمُ ٱلۡجَهۡرَ وَمَا يَخۡفَىٰ ٧७. परंतु जे काही अल्लाह इच्छिल. निःसंशय, तो उघड आणि लपलेले सर्व काही जाणतो وَنُيَسِّرُكَ لِلۡيُسۡرَىٰ ٨८. आणि आम्ही तुमच्यासाठी सहजता निर्माण करू فَذَكِّرۡ إِن نَّفَعَتِ ٱلذِّكۡرَىٰ ٩९. तेव्हा तुम्ही उपदेश करीत राहा जर उपदेश काही लाभ देईल سَيَذَّكَّرُ مَن يَخۡشَىٰ ١٠१०. (अल्लाहचे) भय बाळगणारा तर बोध ग्रहण करील وَيَتَجَنَّبُهَا ٱلۡأَشۡقَى ١١११. तथापि दुर्दैवी, यापासून दूर पळेल ٱلَّذِي يَصۡلَى ٱلنَّارَ ٱلۡكُبۡرَىٰ ١٢१२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल ثُمَّ لَا يَمُوتُ فِيهَا وَلَا يَحۡيَىٰ ١٣१३. जिथे मग तो ना मरेल, ना जगेल, (किंबहुना मरणासन्न स्थितीतच पडून राहील) قَدۡ أَفۡلَحَ مَن تَزَكَّىٰ ١٤१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला وَذَكَرَ ٱسۡمَ رَبِّهِۦ فَصَلَّىٰ ١٥१५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज पढत राहिला بَلۡ تُؤۡثِرُونَ ٱلۡحَيَوٰةَ ٱلدُّنۡيَا ١٦१६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता وَٱلۡأٓخِرَةُ خَيۡرٌ وَأَبۡقَىٰٓ ١٧१७. आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) अतिशय उत्तम निरंतर टिकून राहणारी आहे إِنَّ هَٰذَا لَفِي ٱلصُّحُفِ ٱلۡأُولَىٰ ١٨१८. या गोष्टीचे वर्णन पूर्वी (अवतरित झालेल्या) ग्रंथातही आहे صُحُفِ إِبۡرَٰهِيمَ وَمُوسَىٰ ١٩१९. (अर्थात) इब्राहीम आणि मूसा यांच्या ग्रंथात

Translation: Muhammad Shafi I Ansari.