Millat al-Islam

Chapter 86 · 17 verses · Muhammad Shafi I Ansari

Surah At-Tariq in Marathi

Arabic with tafsir Listen to Surah At-Tariq (1312 reciters)
Meccanسورة الطارق17 verses

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

وَٱلسَّمَآءِ وَٱلطَّارِقِ ١१. शपथ आहे आकाशाची आणि अंधारात प्रकट होणाऱ्याची وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا ٱلطَّارِقُ ٢२. तुम्हाला काय माहीत की तो रात्री प्रकट होणारा काय आहे ٱلنَّجۡمُ ٱلثَّاقِبُ ٣३. तो एक तेजस्वी तारा आहे إِن كُلُّ نَفۡسٍ لَّمَّا عَلَيۡهَا حَافِظٌ ٤४. असा कोणीही नाही, ज्याच्यावर संरक्षक फरिश्ता (नियुक्त) नसेल فَلۡيَنظُرِ ٱلۡإِنسَٰنُ مِمَّ خُلِقَ ٥५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे خُلِقَ مِن مَّآءٍ دَافِقٍ ٦६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे يَخۡرُجُ مِنۢ بَيۡنِ ٱلصُّلۡبِ وَٱلتَّرَآئِبِ ٧७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते إِنَّهُۥ عَلَىٰ رَجۡعِهِۦ لَقَادِرٌ ٨८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे يَوۡمَ تُبۡلَى ٱلسَّرَآئِرُ ٩९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल فَمَا لَهُۥ مِن قُوَّةٍ وَلَا نَاصِرٍ ١٠१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल وَٱلسَّمَآءِ ذَاتِ ٱلرَّجۡعِ ١١११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ وَٱلۡأَرۡضِ ذَاتِ ٱلصَّدۡعِ ١٢१२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ إِنَّهُۥ لَقَوۡلٌ فَصۡلٌ ١٣१३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे وَمَا هُوَ بِٱلۡهَزۡلِ ١٤१४. ही हास्य-विनोदाची (आणि निरर्थक) गोष्ट नाही إِنَّهُمۡ يَكِيدُونَ كَيۡدًا ١٥१५. तथापि इन्कारी लोक कट - कारस्थान करीत आहेत وَأَكِيدُ كَيۡدًا ١٦१६. आणि मी देखील एक डाव चालत आहे فَمَهِّلِ ٱلۡكَٰفِرِينَ أَمۡهِلۡهُمۡ رُوَيۡدَۢا ١٧१७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही दिवस मोकळीक द्या

Translation: Muhammad Shafi I Ansari.