ملة الإسلام

السورة 77 · 50 آية · Muhammad Shafi I Ansari

سورة المرسلات باللغة الماراثية

السورة بالعربية مع التفسير استمع إلى سورة المرسلات (1,226 قارئاً)
مكيةسورة المرسلات٥٠ آية

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

وَٱلۡمُرۡسَلَٰتِ عُرۡفًا ١१. मनमोहक, सतत चालणाऱ्या मंद हवेची शपथ فَٱلۡعَٰصِفَٰتِ عَصۡفًا ٢२. मग जोरात (वेगाने) वाहू लागणारींची शपथ وَٱلنَّٰشِرَٰتِ نَشۡرًا ٣३. आणि (ढगांना) पसरविणारींची शपथ فَٱلۡفَٰرِقَٰتِ فَرۡقًا ٤४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे فَٱلۡمُلۡقِيَٰتِ ذِكۡرًا ٥५. आणि वहयी (प्रकाशना) आणणाऱ्या फरिश्त्यांची शपथ عُذۡرًا أَوۡ نُذۡرًا ٦६. जी (वहयी) आरोपाचे खंडन करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी असते إِنَّمَا تُوعَدُونَ لَوَٰقِعٌ ٧७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे فَإِذَا ٱلنُّجُومُ طُمِسَتۡ ٨८. तर जेव्हा तारे निस्तेज केले जातील وَإِذَا ٱلسَّمَآءُ فُرِجَتۡ ٩९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल وَإِذَا ٱلۡجِبَالُ نُسِفَتۡ ١٠१०. आणि जेव्हा पर्वत तुकडे तुकडे करून उडविले जातील وَإِذَا ٱلرُّسُلُ أُقِّتَتۡ ١١११. आणि जेव्हा पैगंबरांना निर्धारित वेळेवर आणले जाईल لِأَيِّ يَوۡمٍ أُجِّلَتۡ ١٢१२. कोणत्या दिवसाकारीता (त्यांना) थांबविले गेले आहे لِيَوۡمِ ٱلۡفَصۡلِ ١٣१३. निर्णयाच्या दिवसाकरिता وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا يَوۡمُ ٱلۡفَصۡلِ ١٤१४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ١٥१५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुःस्थिती (विनाश) आहे أَلَمۡ نُهۡلِكِ ٱلۡأَوَّلِينَ ١٦१६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले ثُمَّ نُتۡبِعُهُمُ ٱلۡأٓخِرِينَ ١٧१७. मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ नंतरच्या लोकांना आणले كَذَٰلِكَ نَفۡعَلُ بِٱلۡمُجۡرِمِينَ ١٨१८. आम्ही अपराधी लोकांशी असाच व्यवहार करतो وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ١٩१९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता विनाश आहे أَلَمۡ نَخۡلُقكُّم مِّن مَّآءٍ مَّهِينٍ ٢٠२०. काय आम्ही तुम्हाला तुच्छ पाण्या (वीर्या) पासून निर्माण केले नाही فَجَعَلۡنَٰهُ فِي قَرَارٍ مَّكِينٍ ٢١२१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले إِلَىٰ قَدَرٍ مَّعۡلُومٍ ٢٢२२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत فَقَدَرۡنَا فَنِعۡمَ ٱلۡقَٰدِرُونَ ٢٣२३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٢٤२४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे أَلَمۡ نَجۡعَلِ ٱلۡأَرۡضَ كِفَاتًا ٢٥२५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले أَحۡيَآءً وَأَمۡوَٰتًا ٢٦२६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही وَجَعَلۡنَا فِيهَا رَوَٰسِيَ شَٰمِخَٰتٍ وَأَسۡقَيۡنَٰكُم مَّآءً فُرَاتًا ٢٧२७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٢٨२८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे ٱنطَلِقُوٓاْ إِلَىٰ مَا كُنتُم بِهِۦ تُكَذِّبُونَ ٢٩२९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते ٱنطَلِقُوٓاْ إِلَىٰ ظِلٍّ ذِي ثَلَٰثِ شُعَبٍ ٣٠३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत لَّا ظَلِيلٍ وَلَا يُغۡنِي مِنَ ٱللَّهَبِ ٣١३१. जी वास्तविक ना छाया देणारी आहे आणि ना ज्वालापासून वाचवू शकते إِنَّهَا تَرۡمِي بِشَرَرٍ كَٱلۡقَصۡرِ ٣٢३२. निःसंशय, (जहन्नम) महालासारख्या चिंगाऱ्या फेकते كَأَنَّهُۥ جِمَٰلَتٌ صُفۡرٌ ٣٣३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٣٤३४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुर्दशा (विनाश) आहे هَٰذَا يَوۡمُ لَا يَنطِقُونَ ٣٥३५. आज (चा दिवस) असा दिवस आहे की ते बोलूही शकणार नाहीत وَلَا يُؤۡذَنُ لَهُمۡ فَيَعۡتَذِرُونَ ٣٦३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٣٧३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे هَٰذَا يَوۡمُ ٱلۡفَصۡلِۖ جَمَعۡنَٰكُمۡ وَٱلۡأَوَّلِينَ ٣٨३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे فَإِن كَانَ لَكُمۡ كَيۡدٌ فَكِيدُونِ ٣٩३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٤٠४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता إِنَّ ٱلۡمُتَّقِينَ فِي ظِلَٰلٍ وَعُيُونٍ ٤١४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये وَفَوَٰكِهَ مِمَّا يَشۡتَهُونَ ٤٢४२. आणि त्या फळांमध्ये, ज्यांची ते इच्छा करतील كُلُواْ وَٱشۡرَبُواْ هَنِيٓـَٔۢا بِمَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ ٤٣४३. (हे जन्नतमध्ये राहणाऱ्यांनो!) मजेत खा आणि प्या, आपल्या कृत-कर्मांच्या मोबदल्यात إِنَّا كَذَٰلِكَ نَجۡزِي ٱلۡمُحۡسِنِينَ ٤٤४४. निःसंशय, आम्ही सत्कर्म (नेकी) करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٤٥४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे كُلُواْ وَتَمَتَّعُواْ قَلِيلًا إِنَّكُم مُّجۡرِمُونَ ٤٦४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٤٧४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे وَإِذَا قِيلَ لَهُمُ ٱرۡكَعُواْ لَا يَرۡكَعُونَ ٤٨४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही وَيۡلٌ يَوۡمَئِذٍ لِّلۡمُكَذِّبِينَ ٤٩४९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा विनाश आहे فَبِأَيِّ حَدِيثِۭ بَعۡدَهُۥ يُؤۡمِنُونَ ٥٠५०. आता या (कुरआना) नंतर कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील

الترجمة: Muhammad Shafi I Ansari.