ملة الإسلام

السورة 78 · 40 آية · Muhammad Shafi I Ansari

سورة النبأ باللغة الماراثية

السورة بالعربية مع التفسير استمع إلى سورة النبأ (1,427 قارئاً)
مكيةسورة النبأ٤٠ آية

بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ

عَمَّ يَتَسَآءَلُونَ ١१. हे लोक कोणत्या गोष्टीची विचारपूस करीत आहेत عَنِ ٱلنَّبَإِ ٱلۡعَظِيمِ ٢२. त्या मोठ्या खबरीची ٱلَّذِي هُمۡ فِيهِ مُخۡتَلِفُونَ ٣३. ज्याबाबत हे अनेक मत (विचार) राखतात كـَلَّا سَيَعۡلَمُونَ ٤४. निश्चितपणे हे आताच जाणून घेतील ثُمَّ كـَلَّا سَيَعۡلَمُونَ ٥५. पुन्हा निश्चितपणे त्यांना फार लवकर माहीत पडेल أَلَمۡ نَجۡعَلِ ٱلۡأَرۡضَ مِهَٰدًا ٦६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले وَٱلۡجِبَالَ أَوۡتَادًا ٧७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले وَخَلَقۡنَٰكُمۡ أَزۡوَٰجًا ٨८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले وَجَعَلۡنَا نَوۡمَكُمۡ سُبَاتًا ٩९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले وَجَعَلۡنَا ٱلَّيۡلَ لِبَاسًا ١٠१०. आणि रात्रीला आम्ही पडदा (आवरण) बनविले وَجَعَلۡنَا ٱلنَّهَارَ مَعَاشًا ١١११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले وَبَنَيۡنَا فَوۡقَكُمۡ سَبۡعًا شِدَادًا ١٢१२. आणि तुमच्या वरती आम्ही सात मजबूत आकाश बनविले وَجَعَلۡنَا سِرَاجًا وَهَّاجًا ١٣१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला وَأَنزَلۡنَا مِنَ ٱلۡمُعۡصِرَٰتِ مَآءً ثَجَّاجًا ١٤१४. आणि ढगांद्वारे आम्ही मुसळधार पर्जन्यवृष्टी केली لِّنُخۡرِجَ بِهِۦ حَبًّا وَنَبَاتًا ١٥१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात وَجَنَّٰتٍ أَلۡفَافًا ١٦१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या) إِنَّ يَوۡمَ ٱلۡفَصۡلِ كَانَ مِيقَٰتًا ١٧१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे يَوۡمَ يُنفَخُ فِي ٱلصُّورِ فَتَأۡتُونَ أَفۡوَاجًا ١٨१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल وَفُتِحَتِ ٱلسَّمَآءُ فَكَانَتۡ أَبۡوَٰبًا ١٩१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील وَسُيِّرَتِ ٱلۡجِبَالُ فَكَانَتۡ سَرَابًا ٢٠२०. आणि पर्वत चालविले जातील, तेव्हा ते पांढरी वाळू बनतील إِنَّ جَهَنَّمَ كَانَتۡ مِرۡصَادًا ٢١२१. निःसंशय, जहन्नम टपून बसली आहे لِّلطَّٰغِينَ مَـَٔابًا ٢٢२२. विद्रोही (उदंड) लोकांचे ठिकाण तेच आहे لَّٰبِثِينَ فِيهَآ أَحۡقَابًا ٢٣२३. त्यात ते युगानुयुगे (आणि शतके) पडून राहतील لَّا يَذُوقُونَ فِيهَا بَرۡدًا وَلَا شَرَابًا ٢٤२४. ना कधी त्यात शीतलतेची गोडी चाखतील, ना पाण्याची إِلَّا حَمِيمًا وَغَسَّاقًا ٢٥२५. गरम (उकळते) पाणी आणि वाहत्या पू-खेरीज جَزَآءً وِفَاقًا ٢٦२६. (त्यांना) पूर्णपणे मोबदला मिळेल إِنَّهُمۡ كَانُواْ لَا يَرۡجُونَ حِسَابًا ٢٧२७. त्यांना तर हिशोबाची आशाच नव्हती وَكَذَّبُواْ بِـَٔايَٰتِنَا كِذَّابًا ٢٨२८. ते निडरतेने आमच्या आयतींना खोटे ठरवित असत وَكُلَّ شَيۡءٍ أَحۡصَيۡنَٰهُ كِتَٰبًا ٢٩२९. आम्ही प्रत्येक गोष्ट लिहून सुरक्षित ठेवली आहे فَذُوقُواْ فَلَن نَّزِيدَكُمۡ إِلَّا عَذَابًا ٣٠३०. आता तुम्ही (आपल्या कर्मांचा) स्वाद चाखा. आम्ही तुमच्या शिक्षेतच वाढकरीत राहू إِنَّ لِلۡمُتَّقِينَ مَفَازًا ٣١३१. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता सफलता आहे حَدَآئِقَ وَأَعۡنَٰبًا ٣٢३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत وَكَوَاعِبَ أَتۡرَابًا ٣٣३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत وَكَأۡسًا دِهَاقًا ٣٤३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत لَّا يَسۡمَعُونَ فِيهَا لَغۡوًا وَلَا كِذَّٰبًا ٣٥३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील جَزَآءً مِّن رَّبِّكَ عَطَآءً حِسَابًا ٣٦३६. (त्यांना) तुमच्या पालनकर्त्यातर्फे (त्यांच्या सत्कर्मांचा) हा मोबदला मिळेल, जो फार मोठे बक्षीस असेल رَّبِّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَيۡنَهُمَا ٱلرَّحۡمَٰنِۖ لَا يَمۡلِكُونَ مِنۡهُ خِطَابًا ٣٧३७. (त्या) पालनकर्त्यातर्फे मिळेल, जो आकाशांचा आणि जमिनीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, त्या सर्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे, आणि मोठा दयावान आहे. कोणालाही त्याच्याशी बोलण्याचा अधिकार नसेल يَوۡمَ يَقُومُ ٱلرُّوحُ وَٱلۡمَلَٰٓئِكَةُ صَفًّاۖ لَّا يَتَكَلَّمُونَ إِلَّا مَنۡ أَذِنَ لَهُ ٱلرَّحۡمَٰنُ وَقَالَ صَوَابًا ٣٨३८. ज्या दिवशी रुह (आत्मा) आणि फरिश्ते रांगा बांधून उभे असतील तेव्हा कोणी बोलू शकणार नाही, मात्र ज्याला अतिशय दयावान (रहमान) अनुमती देईल, आणि तो उचित गोष्ट तोंडातून काढील (बोलेल) ذَٰلِكَ ٱلۡيَوۡمُ ٱلۡحَقُّۖ فَمَن شَآءَ ٱتَّخَذَ إِلَىٰ رَبِّهِۦ مَـَٔابًا ٣٩३९. हा दिवस सत्य आहे, आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ (सत्कर्मे करून) स्थान बनवावे إِنَّآ أَنذَرۡنَٰكُمۡ عَذَابًا قَرِيبًا يَوۡمَ يَنظُرُ ٱلۡمَرۡءُ مَا قَدَّمَتۡ يَدَاهُ وَيَقُولُ ٱلۡكَافِرُ يَٰلَيۡتَنِي كُنتُ تُرَٰبَۢا ٤٠४०. आम्ही तुम्हाला निकट भविष्यात घडून येणाऱ्या शिक्षा यातनेचे भय दाखविले (आणि सावध केले) ज्या दिवशी मनुष्य आपल्या हातांनी केलेल्या कमाई (कर्मा) ला पाहील आणि काफिर म्हणेल की, मी माती झालो असतो तर (बरे झाले असते)

الترجمة: Muhammad Shafi I Ansari.